पाणीबिलामधील त्रुटी दूर करण्याबाबत महापालिकेची विशेष मोहिम

22/05/2019
City Wide | माहिती व जनसंपर्क विभाग

More Information

ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सन 2019-20 (माहे मे) अखेरपर्यतच्या आर्थिक वर्षाची पाण्याच्या नळसंयोजनाची देयके देण्यात येत आहे. या देयकांमध्ये क्षेत्रफळ, कुटुंबसंख्या, सदनिका संख्या, थकबाकी रक्कम, प्रशासकीय आकाराची रक्कम यामध्ये काही त्रुटी असल्यास त्या दूर करण्याची मोहिम हाती घेण्यात येत आहे. नागरिकांच्या सोईसाठी बिलामधील त्रुटी दूर करण्यासाठी 1 जून ते 30 जून 2019 या कालावधीमध्ये ही मोहिम राबविण्यात येत आहे.

तरी वरील नमूद कालावधीमध्ये नागरिकांनी आपल्या जवळच्या प्रभाग समिती कार्यालयामध्ये पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, मीटर रीडर यांच्याकडे प्राप्त झालेले पाणी बिल व इतर सर्व कागदपत्रासह समक्ष जाऊन बिलामधील त्रुटी दूर करुन सुधारित बिल प्राप्त करुन घ्यावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

02225364779
Share: