ठाणे महानगरपालिकेची कर वसुली कार्यालये 31 मार्चपर्यंत सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार

16/11/2018
City Wide | माहिती व जनसंपर्क विभाग

More Information

नागरिकांना 31 मार्चच्या आधी मालमत्ता कर रक्कम भरणे सुलभ व्हावे यासाठी महापालिकेची कर वसुली कार्यालये 31 मार्च 2019 पर्यंत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरु ठेवण्यात येणार आहेत.

सन 2018-2019 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर नागरिकांना वेळेत भरता यावी यासाठी महापालिकेची  सर्व प्रभाग समिती कार्यालये व उप प्रभाग कार्यालये दिनांक १ डिसेंबर २०१८ ते ३१ मार्च २०१९ पर्यत दुसरा आणि चौथा शनिवार आणि इतर सार्वजनिक सुट्टींच्या दिवशी (दिनांक २१ मार्च २०१९ वगळून)  सकाळी 10.30 ते 5.00 या वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर  सर्व रविवारी  सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 (अर्धा दिवस) या वेळेत सुरु राहणार आहेत. तसेच नागरिकांना महापालिकेच्या  www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. तरी सर्व मालमत्ताधारक नागरिकांनी आपला कर वेळेत भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

02225364779
Share: