Event Expired

वृक्षवल्ली 2019

Thane West | रेमंड कंपनी मैदान
Start at: 11-01-2019 2:30 pm

झाडांचे जतन व्हावे,नवीन झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता व्हावी याकरिता  वृक्षवल्ली उपक्रमाअंतर्गत गेल्या 11 वर्षापासून ठाणे महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाच्यावतीने असे प्रदर्शन आयोजित केले जाते .

या प्रदर्शनात शोभिवंत पानाफुलांच्या कुंड्या ,वामनवृक्ष ,कॅक्टस ,सकुलंट,ब्रोमेलियाझ ,ऑर्किडस गुलाब पुष्प, पुष्प रचना औषध व सुंगधी ,व वनस्पती फळ झाडे  फळांची मांडणी ,भाजीपाला ,उद्यान प्रतिकृती ,निसर्ग व पर्यावरण आधारित छायाचित्र ,रंगचित्र आदीचे प्रदर्शन नागरिकांना पाहायला मिळणार आहे.

या प्रदर्शनामध्ये नारिकांना  आपल्या  आवडती  शोभिवंत झाडे ,फुलांची  रोपे ,कुंड्या ,हंगामी फुलांची रोपे,औषधी वनस्पती ,गुलाब रोपे , फळझाडे ,उद्यानासाठीची अवजारे ,बी -बियाणे, खते, आदींची खरेदी करता येणार आहे . या स्पर्धेसाठी बेडेकर महाविद्यालयाचे डॉ.टेकाळे, माहिम नेचर पार्कचे उपसंचालक अविनाश कुबल, डॉ. साळुंखे , डॉ .संजय पोतदार ,प्रकाश गिरी ,वैष्णवी पटवर्धन आदी एकूण २० विविध शासकीय आणि खाजगी संस्थांच्या उद्यान विभागांचे तज्ञ परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

माहिम नेचर पार्क (धारावी मुंबई), बृहन्मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका,रिलायंस कॉर्पोरेट आयटी पार्क (नवी मुंबई), गोदरेज बॉईस कंपनी लि. (विक्रोळी), पीरमॉल ग्रुप ,रेमण्ड कंपनी(ठाणे) हिरानंदानी इस्टेट (ठाणे), टी आय एफ आर (कुलबा), एस. एच. केळकर कंपनी (मुलुंड),लोढा गृप (ठाणे), सेंन्ट्रल रेल्वे (मुंबई), निळकंठ गृप (ठाणे), कल्पतरु गृप (ठाणे), मिरा भाईंदर महानगरपालिका, आर. सी. एफ. (चेंबुर), बी. ए. आर. सि. (चेंबुर) इत्यादी मातब्बर संस्थांबरोबरच रुचा बोनसाई (डोंबिवली), कल्पतरु व्हर्मी कंपोस्ट (मुंबई), बेन्सन इंडिया (मुंबई), डायमंड नर्सरी (पुणे), पेटल्स प्लॅन्टस् नर्सरी (ठाणे), सोनचाफा नर्सरी (मुंबई), बिस्वास नर्सरी (ठाणे), पुष्पपर्णी नर्सरी, (ठाणे), अपुर्वा नर्सरी (ठाणे), पुनम फुलोरा नर्सरी (पुणे), नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट (अहमदनगर), संजय नर्सरी (पुणे),आशिका रोझरी नर्सरी (दापोली), ग्रीन लॅन्ड नर्सरी (पुणे), तुकाई नर्सरी (पुणे), ए. डी. मोरे नर्सरी (वांगणी) पठारी नर्सरी (कल्याण), पालवी नर्सरी (पुणे), सरोज कॅक्टर्स (नाशिक), ए.के.दिवान नर्सरी (कलकत्ता),सुगंधीम (कुर्ला) अशा विविध प्रकारचे नर्सरी व कृषी विषयक बी-बियाणे,उत्पादने, औषधे, अवजारे, कुंडया इत्यादीचे एकूण 40 स्टॉल्सधारकांसह अंदाजे 100 वैयक्तीक स्पर्धक सहभागी होणार आहेत.

ADDRESS: रेमंड कंपनी मैदान लक्ष्मी नगर, ठाणे वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र 400606
WEB PAGE
Share: